सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 12 जुलै 2021 (19:39 IST)

‘धकधक गर्ल'ची नवी इनिंग

जगभरामध्ये कोरोना व्हायरसचा कहर दोन वर्षांपासून कायम आहे. सरकारने काही ठिकाणी अत्यावश्यक सेवा वगळता लॉकडाउन जाहीर केला आहे. लॉकडाउनमुळे चित्रपटसृष्टीचे कामकाजसुद्धा काही प्रमाणात ठप्प झाले असून, संपूर्ण चित्रपटसृष्टीला उतरती कळा लागली आहे. अशा परिस्थितीत अनेक कलाकारांनी आपला मोर्चा ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळवला असल्याचे दिसून येत आहे. नव्या आशासह नवे कलाकार ओटीटीवर धुमाकूळ घालत आहेत. याच कारणामुळे अनेक सुपरस्टार्सदेखील वेगवेगळ्या प्रकारे डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये सामील होत आहेत. आता या यादीत बॉलिवूडची ‘धकधक गर्ल' अभिनेत्री माधुरी दीक्षितचाही समावेश होणार असून, नुकतीच माधुरी दीक्षित हिच्या पहिल्या वेब सीरिजविषयी माहिती समोर आली आहे. 
 
माधुरी प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या प्रोडक्शनमधून डिजिटल विश्र्वात पदार्पण करणार आहे. दरम्यान, माधुरी दीक्षितची ही वेबसीरिज ‘फॉमिली ड्रामा' असणार आहे. ‘दीवार' चित्रपटाच्या ‘मेरे पास माँ है' या संवादातून त्याचे नाव ठेवण्यात येणार  आहे. नावाप्रमाणेच ही सीरिजदेखील विशेष असणार आहे.