रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 जुलै 2019 (16:23 IST)

'होशियार चंद'च्या भूमिकेत परेश रावल?

गोविंदा आणि करिश्मा कपूर यांचा 1995मधील सुपरहिट चित्रपट 'कुली नंबर 1' चित्रपटाच्या रिमेकची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. डायरेक्टर डेविड धवनच्या या चित्रपटात मुख्यभूमिकेत वरुण धवन आणि सारा अली-खान झळकणार आहे. याशिवाय मूळ चित्रपटात कादर खानने साकारलेली होशियार चंदची भूमिका अनुपम खेर साकारणार असल्याची चर्चा होती. पण या चित्रपटात मी काम करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. आता या भूमिकेसाठी परेश रावल यांना कास्ट करण्यात आले आहे. 'कुली नंबर 1'मध्ये सारा अली-खानच्या वडिलांची भूमिका ते साकारणार आहेत. या चित्रपटाचे शूटिंग ऑगस्ट महिन्यात थायलंडची राजधानी बँकॉक येथे सुरु करण्यात येणार आहे. हे चित्रीकरण सुमारे 20 दिवस चालणार आहे. या ठिकाणी सारा, वरुण आणि परेश रावल यांचे सीन शूट करण्यात येणार आहेत. दरम्यान, चित्रपटात परेश रावलची दुसरी मुलगी आणि साराच्या बहिणीच्या भूमिकेसाठी दिशा पाटणीचे नाव आघाडीवर आहे. पण अद्याप त्याला दुजोरा मिळालेला नाही. हा चित्रपट पुढील वर्षी 1 मे रोजी चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.