मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 20 जानेवारी 2022 (10:30 IST)

या प्रसिद्ध अभिनेत्याच्या वडिलांचे निधन

कोरोना व्हायरसचा कहर थांबण्याचे नाव घेत नाही आहे. लाखो लोक या साथीच्या आजाराला बळी पडत आहेत. कोरोनाने टीव्ही इंडस्ट्री आणि त्याच्याशी संबंधित स्टार्सवरही कहर केला आहे. आत्तापर्यंत अनेक स्टार्स आणि त्यांचे जवळचे लोक या महामारीच्या विळख्यात आले आहेत. आता हिंदी टेलिव्हिजन वरील लोकप्रिय अभिनेता शाहीर शेख याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील शाहनवाज शेख यांचे निधन झाले आहे. 
 
'पवित्र रिश्ता 2' फेम अभिनेता शाहीर शेख यांच्या वडिलांना काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. दोनदिवसांपूर्वी शाहीर शेखने ट्विट करत वडीलांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती दिली होती. वडिलांची प्रकृती चिंताजनक असून ते व्हेंटिलेटरवर असल्याचे त्याने सांगितले होते. तसेच त्यामध्ये कोरोनाची लागण झाल्याची माहितीदेखील देत आपल्या वडिलांसाठी प्रार्थना करण्याचे आवाहनही त्याने चाहत्यांना केले होते.