सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 18 जून 2022 (14:06 IST)

Coffee With Karan : रणबीर कपूर आणि आलिया भट्ट, कॉफी विथ करण मध्ये दिसणार नाही

बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहर लवकरच त्याच्या लोकप्रिय आणि वादग्रस्त चॅट शो 'कॉफी विथ करण'चा सातवा सीझन घेऊन येत आहे. अलीकडेच, करण ने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एका पोस्टद्वारे शोच्या नवीन सीझनची घोषणा केली.
 
कॉफी विथ करणचा सातवा सीझन 7 जुलै रोजी प्रीमियर होणार आहे. यावेळी हा शो टेलिव्हिजनऐवजी OTT प्लॅटफॉर्म Disney Plus Hotstar वर येईल. शोच्या पहिल्या भागात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट दिसणार अशी अपेक्षा असल्याने चाहते या सीझनची आतुरतेने वाट पाहत होते. पण नुकत्याच एका मुलाखतीदरम्यान करण जोहरने खुलासा केला आहे की, रणबीरला या शोमध्ये येण्यात रस नाही. 
 
चित्रपट निर्माता करण जोहर म्हणाले, "रणबीरने मला आधीच सांगितले आहे की 'मी या शोमध्ये येणार नाही'.मी तुझ्यावर प्रेम करतो, मी तुझ्या घरी येईन आणि तुझ्याशी बोलेन. मला घरी कॉफी दे, पण मी या शो मध्ये नाही येणार."
 
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरला करण जोहरचा हा शो आवडत नाही आणि त्याने हे अनेकदा सांगितले आहे. एका मुलाखतीदरम्यान त्याने सांगितले की तो या गॉसिप शोला कंटाळला आहे. रणबीर शेवटचा कॉफी विथ करणच्या शोमध्ये रणवीर सिंगसोबत दिसला होता. यादरम्यान त्याने काही धक्कादायक गोष्टी केल्या. त्यांची इंटरनेटवर बराच वेळ चर्चा झाली. कामाच्या आघाडीवर, रणबीर आणि आलिया लवकरच ब्रह्मास्त्र चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट 9 सप्टेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.