शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

कर्करोगाचा उपचार करवत असल्या ऋषी कपूरने इमोशनल पोस्ट लिहून व्यक्त केली वेदना

कर्करोगाने लढत असलेले बॉलीवूड अभिनेता ऋषी कपूर यांच्या आरोग्यात आता खूप सुधारणा झाली आहे आणि ते लवकरच भारत परततील. अशी बातमी गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहे. या दरम्यान ऋषी कपूरने आपल्या नवीन पोस्टने फॅन्सला आश्चर्यचकित केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावर आता एक भावनात्मक पोस्ट केली आहे, त्यात त्यांची वेदना अगदी स्पष्टपणे दिसत आहे.
 
ऋषी कपूरने आपल्या सोशल अकाउंटवर लिहिले, 'आज मला न्यूयॉर्कमध्ये 8 महिने झाले आहे. काय मी कधी घरी जाऊ शकेन?' त्यांच्या या भावनात्मक पोस्टद्वारे आपण अनुमान लावू शकतो की ते शक्य तितक्या लवकर त्यांच्या घरी आणि कुटुंबाकडे परत जाणे इच्छुक आहे. त्यांच्या या इमोशनल पोस्टावर फॅन्स सतत कमेंट करून त्यांची लवकर बरे होण्याची कामना करत आहे. 
 
सप्टेंबर 2018 पासून ऋषी कपूर न्यूयॉर्कमध्ये आपले उपचार करवत आहे. जेव्हा ते न्यूयॉर्कला गेले होते तेव्हा त्यांनी सोशल मीडियावर याबद्दल माहिती दिली होती. न्यूयॉर्कमध्ये ऋषी कपूरला भेटण्यासाठी बॉलीवूड स्टार जात राहतात, पण त्यांच्या आजारपणाबद्दल कोणी ही सांगितले नव्हते. ऋषी कपूरच्या आजाराबद्दल लोकांना माहिती तेव्हां मिळाली जेव्हा गेल्या दिवसांत चित्रपट निर्माते राहुल रवैल त्यांना भेटले आणि ऋषी कपूर कर्करोगाने आजारी असल्याची माहिती सोशल मीडियावर शेअर केली. राहुलच्या पोस्टनंतर ऋषी कपूर यांनी कबूल केले होते की ते कर्करोगाने पीडित होते. एका मुलाखतीत ऋषी कपूर यांनी कर्करोगाशी आपलं संघर्षाचा अनुभव शेअर केला.