गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

वाद नको, सलमानने सिनेमाचे नाव बदलले

सलमान खान आपल्या होम प्रोडक्शनच्या बॅनर खाली 'लवरात्री' सिनेमा करत आहे. या सिनेमाच्या टायटलवरून हिंदू संघटनांनी विरोध दर्शवला आहे. त्यांनी म्हटलं की, लवरात्रिला नवरात्री या पवित्र सणाशी असं जोडणं योग्य नाही. यानंतर सलमान खानने मंगळवारी 18 सप्टेंबर रोजी रात्री या सिनेमाचं टायटल बदललं आहे. या सिनेमाचं नवं नाव जाहीर केलं आहे. सलमान खानने या सिनेमाचं लेटेस्ट पोस्टर शेअर केले आहेत. ही कोणतीही मिस्टेक नाही... तर लवरात्री, प्रेम आता सर्वांच्या पुढे...  
 
या सिनेमातून अर्पिताचा नवरा आयुष शर्मा आणि अभिनेत्री वरिना हुसैनला बॉलिवूडमध्ये लाँच करत आहे. सलमान खान आणि त्याची संपूर्ण टीम आता या सिनेमाच्या रिलीज दरम्यान कोणताही वाद करू इच्छित नाही. सेन्सर बोर्ड असो किंवा करणी सेना यांच्याकडून त्यांना कोणताही वाद नको आहे. याकरता त्यांनी टायटल बदललं आहे.