बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 22 जुलै 2021 (16:33 IST)

राज कुंद्राकडून पोलिसांना लाच दिल्याचा खळबळजनक दावा

बॉलीवुड अ‍ॅक्ट्रेस शिल्पा शेट्टीचा पती बिझनेसमन राज कुंद्रा यांनी पोलिसांना 25 लाख रुपयांची लाच दिल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. याच प्रकरणातील फरार आरोपी यश ठाकूर यांने हा दावा केला आहे. त्याने आपल्या दाव्यात पोलिसांनी आपल्यालाही लाच मागितल्याचा आरोप केला आहे.
 
राज कुंद्राला अश्लील फिल्म्स तयार करणे आणि त्या अ‍ॅपच्या सहाय्याने रिलीज करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आता राज कुंद्रासंदर्भात एका आरोपीने मोठा खुलासा केला आहे. या प्रकरणात वांटेड असलेल्या एका आरोपीने, राज कुंद्राने अटक टाळण्यासाठी मुंबई पोलीसांच्या क्राइम ब्रांचला 25 लाख रुपयांची लाच दिल्याचा खळबळजनक दावा केला आहे. पॉर्न फिल्म्स प्रकरणात अरविंद श्रीवास्‍तव उर्फ यश ठाकूर हाही आरोपी आहे. त्याने ईमेलच्या माध्यमाने मार्च महिन्यात अँटी करप्‍शन ब्‍यूरोकडे (ACB) यासंदर्भात तक्रारही केली होती. तेव्हा एसीबीने ही तक्रार मुंबई पोलीस कमिश्‍नर ऑफिसला एप्रिलमध्ये पाठवली होती. मात्र, शहरातील पोलीस अधिकारी यावर काहीही बोलत नाहीत. क्राइम ब्रांचने बुधवारी राज कुंद्राच्या अंधेरीतील कार्यालयावरही छापा टाकला होता.
 
अरविंद श्रीवास्‍तवची फ्लिज मूव्हीज नावाची फर्म होती. यापूर्वी तिचे नाव न्‍यूफ्लिक्‍स होते. या फर्मचा संबंध अमेरिकेशी आहे. या फर्मकडून मार्च महिन्यात तक्रार करण्यात आली होती. मार्च महिन्यात पोलिसांनी फर्मचे नावही नोंदवले होते आणि हिचे मालक अरविंद श्रीवास्‍तवचे दोन बँक अकाउंट सीझ केले होते. या अकाउंट्सवर 4.5 कोटी रुपये होते. ईमेलमध्ये न्‍यूफ्लिक्‍सने दावा केला आहे, की पोलिसांच्या एका खबऱ्याने फर्मकडे 25 लाख रुपयांचीही मागणी केली होती.
 
मुंबई पोलीसच्या क्राइम ब्रांचला मोठे यश मिळाले आहे. आरोपी उमेश कामतने तयार केलेले 70 व्हिडिओ क्राइम ब्रांचच्या हाती लागल्याचेही बोलले जात आहे. सांगण्यात येते, की हे सर्व व्हिडिओज कामतने वेग-वेगळ्या प्रोडक्‍शन हाऊसच्या मदतीने तयार केले होते.