सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 डिसेंबर 2017 (15:32 IST)

'सेक्सिएस्ट एशियन मॅन 2017': 'शाहिद कपूर'

ब्रिटनच्या 'ईस्टर्न आय' या साप्ताहिकाच्या वार्षिक पोलमध्ये शाहिद कपूरची 'सेक्सिएस्ट एशियन मॅन 2017' अर्थात 'सर्वात सेक्सी आशियायी पुरुष 2017' म्हणून निवड झाली आहे. या जगभरातील चाहत्यांनी दिलेल्या मतांच्या आधारावर दरवर्षी ही यादी जाहीर केली जाते.

'उडता पंजाब' सिनेमात आपल्या दमदार अभिनयासाठी पुरस्कार पटकावणाऱ्या 36 वर्षी शाहिदने, या पोलमध्ये बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि ब्रिटीश-पाकिस्तानी गायक जायन मलिकला मागे टाकलं आहे. या पोलमध्ये हृतिक रोशन सलग तीन वर्ष दुसऱ्या स्थानावर आहे. तर मागील वर्षाचा विजेता जायनची यंदा मात्र तिसऱ्या स्थानावर घसरण झाली आहे.