बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जानेवारी 2020 (14:10 IST)

श्र्वेता तिवारी पुन्हा प्रेमात

'कसौटी जिंदगी की' या टीव्ही शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री श्र्वेता तिवारीचं वैवाहिक जीवन नेहमीच वादग्रस्त राहिलं. श्र्वेतानं 2 लग्न केली मात्र दोन्ही वेळा तिला अपयश आलं. तिची दोन्ही लग्न तुटली. पण तरीही ती हरली नाही. तिने तिच्या आयुष्यात आलेल्या सर्व समस्यांचा सामना केला. तसेच ती तिच्या दोन्ही मुलांना एकटी सांभाळत आहे. दरम्यानं काही दिवसांपूर्वीच श्र्वेतानं ती पुन्हा एकदा प्रेमात असल्याचा खुलासा केला आहे. श्र्वेताला काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सध्या ती कोणाच्या प्रेमात आहे असा प्रश्र्न विचारण्यात आला. त्यावेळी उत्तर देताना श्र्वेता म्हणाली, मी सुरुवातीपासूनच माझ्या दोन्ही मुलांच्या (पलक आणि रेयांश) प्रेमात आहे. त्यामुळे आता दुसर्‍या कोणत्या व्यक्तीसाठी अजिबात वेळ नाही. श्र्वेता तिवारी पुढे म्हणाली, मझ्या मुलांवर माझं एवढं प्रेम आहे की मला त्यांच्या व्यतिरिक्त तिसर्‍या कोणत्याच व्यक्तीची आता गरज वाटत नाही. माझ्या मुलांसोबत मी खूप खूश आहे. 
 
श्र्वेता तिवारीनं 1998 मध्ये राजा चौधरीशी लग्र केलं होतं मात्र 2007 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तिनं अभिनव कोहलीशी लग्र केलं मात्र तिचं हे लग्नसुद्धा जास्त काळ टिकू शकलं नाही. राजा चौधरीपासून श्र्वेताला पलक नावाची मुलगी आहे. तर अभिनवपासून रेयांश नावाचा एक मुलगा आहे. सध्या शेवता 'हम तुम और देम' ही वेब सीरिज आणि 'मेरे डॅड की दुल्हन'मध्ये काम करत आहे.