गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 3 जानेवारी 2022 (17:00 IST)

"डॉ. गौरी नाथची भूमिका ही मी आत्तापर्यंत साकारलेल्या सर्व पात्रांपेक्षा गुंतागुंतीची"

डिज़्नी+ हॉटस्टारने त्यांच्या आगामी हॉटस्टार स्पेशल ह्युमनचा ट्रेलर रिलीज केला असून भारतातील मानवी औषधांच्या चाचण्यांवर आधारित ही एक वैद्यकीय थ्रिलर सीरिज आहे. ही सस्पेन्स थ्रिलर मालिका मानवी, वैद्यकीय जगाची अनपेक्षित रहस्ये उलगडून दाखवते आणि खून, गूढता, वासना आणि हेरफेर यांचा लोकांवर होणारा परिणाम दाखवणारी चित्तथरारक कथा आहे. विपुल अमृतलाल शाह आणि मोझेझ सिंग दिग्दर्शित, डिस्ने+ हॉटस्टार विशेष मालिका मोजेझ सिंग आणि इशानी बॅनर्जी यांनी लिहिली आहे. या मालिकेत राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री शेफाली शाह आणि अष्टपैलू अभिनेत्री कीर्ती कुल्हारी यांच्यासह विशाल जेठवा, राम कपूर, सीमा बिस्वास, आदित्य श्रीवास्तव आणि मोहन आगाशे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ट्रेलरमधून समोर आलेल्या महत्त्वाच्या पात्रांपैकी एक शेफाली शाहची व्यक्तिरेखा आहे.
 
शेफाली शाहने मानवी पात्राच्या विविध छटा दाखवणाऱ्या अनेक भूमिका साकारल्या आहेत. 'ह्यूमन'मधील तिच्या व्यक्तिरेखेविषयी तिच्याच शब्दात सांगायचे झाले तर, 'ह्यूमन'मधील डॉ. गौरी नाथची भूमिका ही मी आत्तापर्यंत साकारलेल्या सर्व पात्रांपेक्षा गुंतागुंतीची असल्याचे तिने सांगितले. शेफाली म्हणाली, “गौरी नाथ म्हणजे पॅंडोरा बॉक्स आहे. प्रत्येक क्षणाला तुमच्यावर काय आदळते हे कळत नाही. ती क्लिष्ट आणि ठाव न लागणारी व्यक्तिरेखा आहे. मी याआधी अशी भूमिका कधीच केलेली नाही आणि इतकेच नाही, तर मी तिच्यासारख्या कोणाला ओळखत ही नाही किंवा ऐकले देखील नाही!
 
शेफालीला 'ह्यूमन'मध्ये डॉ गौरी नाथच्या भूमिकेत पाहणे नक्कीच आनंददायी ठरणार आहे!
 
घातक साइड इफेक्ट्स असूनही, नवीन औषधाच्या विकासाचा वेगवान मागोवा घेण्यासाठी फार्माद्वारे भारतातील क्लिनिकल चाचण्यांच्या नियमांमधील लूप होल्सचा वापर करण्यात येत आहे. दरम्यान, डॉ. सायरा सभरवाल, 35, हिला भोपाळच्या प्रीमियर हॉस्पिटलमध्ये 45 वर्षीय डॉ. गौरी नाथ यांच्या देखरेखीखाली स्वप्नवत नोकरी मिळते. गौरीच्या आश्रयाने सायरा विकसित होत जाते आणि हळूहळू या दोन महिलांमध्ये त्यांच्या वैद्यकीय क्षेत्राप्रती असलेल्या वचनबद्धतेमुळे एक मजबूत बंध निर्माण होतो. तथापि, एक धक्कादायक शोध त्यांच्या जीवनात वादळ निर्माण करते कारण त्यांची कथा मंगू (20 वर्षे) या तरुण स्थलांतरित कामगारासोबत जोडते, जो अशातऱ्हेची वैद्यकीय चिकित्सा प्रणाली उध्वस्त करण्यास सज्ज झाला आहे.
 
आर्थिक फायद्यासाठी फास्ट-ट्रॅक केलेल्या औषधांच्या चाचण्यांवर बेतलेली ही काल्पनिक सिरीज एक मनोरंजक कथा मांडते ज्यामध्ये एखाद्याच्या लोभामुळे निष्पाप जीव गमावले जातात. मानवी जीवनाचे मूल्य, वैद्यकीय गैरव्यवहार, वर्गविभाजन आणि वेगवान वैद्यकीय शास्त्राचे परिणाम यासारख्या विषयांना स्पर्श करून, 'ह्युमन' सत्ता संघर्ष, गुप्त भूतकाळ, आघात आणि खून इत्यादींच्या आकर्षक कथेत पैसे कमावण्याच्या लोभाला उलगडत जाते.
 
अभिनेत्री शेफाली शाह आणि कीर्ती कुल्हारी, अभिनित 'ह्युमन' 14 जानेवारी 2022 पासून डिस्ने+ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.