सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 23 जून 2021 (13:43 IST)

तारक मेहतामध्ये दयाबेन परतणार?

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ने आजपर्यंत प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली आहे. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. त्यात एक आणखी लोकप्रिय कलाकार म्हणजेच ‘दयाबेन’ अभिनेत्री दिशा वकानीने ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. 
 
आता दयाबेनची वाट बघता बघता चाहते बरेच परेशान झाले आहे. या दरम्यान सोशल ‍मीडियावर ऐक फोटो व्हायरल होत आहे, ज्यात दया बेन च्या लुकमध्ये एक एक्ट्रेस दिसत आहे. टीव्हीची ही एक्ट्रेस आहे गरिमा. गरिमा या अगोदर तारक मेहतामध्ये काम करून चुकली आहे. तसेच तिचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात ती दया बेनप्रमाणे ऍक्ट करताना दिसत आहे. 
 
आपल्या इंस्टाग्रामहून गरिमाने दया बेनच्या लुकमध्ये आपले फोटो शेअर केले आहे ज्यात ती तीन प्रकारे वेग वेगळे एक्सप्रेशन देताना दिसत आहे. दया बेनच्या अवतारात गरिमाला बघून चाहते बरेच खूश झाले आहे.  
 
शो फँस मेकर्सला हा सल्ला देताना दिसत होते की नवीन दया आणून शोला पुढे वाढवायला पाहिजे. पण सध्या हे सस्पेंस आहे की दया बेन शोमध्ये केव्हा परतणार आहे.