वरुण धवन बाबा होणार का? करवा चौथचे फोटो बघून चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या
वरुण धवन आणि नताशा दलाल यांची प्रेमकहाणी एखाद्या परीकथेपेक्षा कमी नाही. त्यांचे चाहते अनेकदा या जोडीच्या रोमँटिक फोटोंची वाट पाहत असतात. अलीकडेच करवा चौथच्या दिवशी वरुणने पत्नी नताशासोबतचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. पण ही छायाचित्रे समोर आल्यापासून चाहत्यांनी या जोडप्याला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे… लोकांनी वरुणला थेट प्रश्न विचारला आहे की त्याची पत्नी नताशा प्रेग्नंट आहे का… आणि तो लवकरच बाबा होणार आहे का?
या रविवारी वरुण धवनने नताशा पत्नी नताशासोबत करवा चौथ साजरी करताना आणि चंद्र पाहतानाचे काही फोटो शेअर केले. लग्नानंतरही वरुण त्याचं आयुष्य आणि नताशाचं आयुष्य खूप लो-प्रोफाईल ठेवतो. तो आपल्या पत्नीसोबतची निवडक छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर करतो. करवा चौथवर शेअर केलेल्या फोटोमध्ये वरुण नताशाच्या पोटावर हात ठेवताना दिसत आहे.
वरुण आणि नताशा या वर्षी जानेवारीमध्ये विवाहबद्ध झाले होते. थेट लग्नानंतरच या दोघांचे वेडिंग फोटो समोर आले होते.