रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 14 डिसेंबर 2021 (17:30 IST)

हनीमूनहून परतले विकी-कतरिना Video ; गळ्यात मंगळसूत्र, हातात चूडा, मुंबईला आलं नवविवाहित जोडपं

9 डिसेंबरला लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कतरिना कैफ आणि विकी कौशल हनीमूनला निघाले. आता हे जोडपे हनीमूनहून परतले आहे. लग्नानंतर दोघेही पहिल्यांदाच पती-पत्नीच्या रुपात मुंबई एअरपोर्टवर दिसले.
 
कतरिना आणि विकीने मीडियाचे आनंदाने अभिवादन केले. क‍तरिना खूप सुंदर दिसतं होती. गळ्यात मंगळसूत्र, हातात चूडा, भांगेत सिंदूर, हलक्या गुलाबी रंगाचा चूडीदार ड्रेस घातलेल्या नायिकेने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. विकी कौशलने ऑफ व्हाईट शर्ट घातलेलं होतं. ते एकमेकांना कॉम्पीमेंट करत होते.
 
राजस्थानमध्ये रॉयल वेडिंगनंतर दोघे दररोज वेडिंग फेस्टिव्हिटीजची फोटोज शेअर करत होते. मेंहदी, हळद, फेरे या न्यूली वेड कपलचे फोटो खूप व्हायरल झाले. 
 
लग्नानंतर 10 डिसेंबरला नवीन जोडपं आणि त्यांचे गेस्ट मुंबईला परतले होते. नवविवाहित सेलिब्रिटी जोडपे विकी कौशल-कतरिना कैफ त्यांच्या लग्नानंतर हनीमून साजरा करण्यासाठी मालदीवला गेले असल्याची चर्चा होती. दोघांना चॉपरमध्ये स्पॉट करण्यात आले होते मात्र याबद्दल प्रमाणिक माहिती अजूनही नाही.
 
कतरिना 15 डिसेंबरपासून 'टायगर 3' ची शूटिंग सुरू करणार आहे. त्याचवेळी विकी 20 डिसेंबरपासून त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगवर परतणार आहे.