शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 17 जानेवारी 2022 (11:14 IST)

परिणीती चोप्राचे लग्न लवकरच होणार ? करण जोहर ने खुलासा केला

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा लग्न कधी करणार? हा असा प्रश्न आहे याच्या  उत्तराची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र आता या प्रश्नाचे उत्तर करण जोहरने दिले आहे. नुकत्याच रिलीज झालेल्या कलर्स हिंदी वरील हुनरहबाज. देश की शान च्या प्रोमोमध्ये याचा खुलासा झाला आहे. 
परिणीती चोप्रा लवकरच 'हुनरबाज' या रिअॅलिटी शोला जज करताना दिसणार आहे. करण जोहर व्यतिरिक्त मिथुन चक्रवर्ती देखील अभिनेत्रीसोबत शोला जज करताना दिसणार आहे. या शोचा प्रोमो आला आहे. या प्रोमोमध्ये करण जोहर म्हणत आहे- 'मी या जोडप्यासाठी खूप भाग्यवान आहे. बरेच मॅच मेकिंग केले आहे आणि ते यशस्वी ही झालो आहेत. यावर परिणिती म्हणाली- 'तू माझ्यासाठी कधीच मॅच मेकिंग केले नाहीस.' प्रत्युत्तरात करण म्हणतो- 'पुढे पाहा आणि काय होते ते पहा. तुझे ही या वर्षांतात होणार. कलर्सने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले - 'करण परिणीतीचा मॅचमेकर झाला, तो तिला द वन शोधू शकेल का?


 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)

कलर्स हिंदी वर हुनरहबाज. देश की शान 22 जानेवारी पासून दर शनिवार-रविवार रात्री 9 वाजता येणार. 
 परिणीती चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती सध्या सूरज बडजात्याच्या 'उंचाई' या चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटात ती मेगास्टार अमिताभ बच्चन, बोमन इराणी, अनुपम खेर, नीना गुप्ता, सारिका आणि डॅनी जोंगपा यांच्यासोबत दिसणार आहे. याशिवाय परिणीती संदीप रेड्डी वंगा यांच्या 'अ‍ॅनिमल' या चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये तिच्यासोबत रणबीर कपूर, अनिल कपूर आणि बॉबी देओल असणार आहेत.