बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 3 नोव्हेंबर 2018 (09:02 IST)

शाहरूख खानचा झिरोचा जबरदस्त ट्रेंलर दिसला वेगळ्या अंदाजात

सुपरस्टार शाहरुख खानचा बहुचर्चित चित्रपट 'जीरो'चा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. शाहरुखच्‍या वाढदिवसाच्‍या दिवशी ट्रेलर रिलीज करण्‍यात आला आहे. 'जीरो' ट्रेलर दिग्‍दर्शक आनंद एल राय आणि शाहरुख यांच्‍या जोडीने एक नवा विषय मांडत आहेत. हा चित्रपट काहीतरी हटके असणार, हे नक्‍की. यापूर्वी त्‍यांनी 'तनु वेड्‍स मनु,' 'रांझना' यासारखे चित्रपट दिग्‍दर्शित केले आहेत. त्यामुळे अपेक्षा वाढल्या आहेत. चित्रपट झिरोमध्‍ये शाहरूख एका कमी उंचीच्या बुटक्‍या माणसाची भूमिका साकारत  दिसून येतोय, यात कॅटसोबत अनुष्‍काही झळकणार आहे. शाहरूख, कॅट आणि अनुष्‍का हे तिघेही याआधी 'जब तक है जान' या चित्रपटात दिसले होते. २१ डिसेंबर २०१८ ला झिरो रिलीज होणार आहे.