शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: गुरूवार, 31 मार्च 2022 (08:25 IST)

राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 चा निकाल जाहीर, मुख्य परीक्षेचंही वेळापत्रक आले समोर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) दिनांक 23 जानेवारी, 2022 रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा (पूर्व) परीक्षा 2021 चा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. हा निकाल https://mpsc.gov.in संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना पाहता येणार आहे.
 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा मुख्य परीक्षा 7, 8 व 9 मे, 2022 रोजी घेण्यात येईल. पूर्व परीक्षेतून मुख्य परीक्षेकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या बैठक क्रमांकासह नावांची यादी व गुणांची कट ऑफ आयोगाच्या https://mpsc.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. या पूर्व परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने केलेल्या अर्जात दिलेल्या माहितीच्या आधारे, त्यांच्या पात्रता तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून, पूर्व परीक्षेच्या निकालाआधारे मुख्य परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुख्य परीक्षेसाठी 31 मार्च 2022 ते 14 एप्रिल 2022 या कालावधीत अर्ज करावा लागणार आहे. पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या (Mains Exam) प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस कळविण्यात येत आहे
 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे जाहीर करण्यात आलेल्या निकाला आधारे, मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 7, 8 आणि 9 मे रोजी अमरावती, औरंगाबाद, मुंबई, नागपूर, नाशिक व पुणे या जिल्हाकेंद्रावर घेण्यात येईल. प्रस्तुत राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 मधून 405 पद भरली जाणार आहेत.