शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. थोडं आंबट थोडं तिखट
Written By वेबदुनिया|

दह्यातील मिरच्या

साहित्य  : 1 किलो लोणच्याच्या मोठ्या मिरच्या, आलं 1 लहान तुकडा, 750 ग्रॅम दही, 6 मोठा चमचे मीठ, 10 मोठे चमचे मोहरी,
1 चमचा हळद.

कृती : मिरच्यांची डेखे काढून त्यांना मध्येच चीर पाडावी व 5 मिनिट उकळून घ्याव्या. आलं बारीक चिरून घ्यावे. दह्यातील पाणी काढून घ्यावे. सर्व मसाला आणि आलं 4 भागात वेग वेगळे करून 3 भाग मिरच्यांनमध्ये भरून घ्यावे व 1 भाग दह्यात बुडवून घेऊन वाळत टाकाव्या, म्हणजे दह्याचे पुटं मिरच्यांवर चांगले बसेल. ह्या मिरच्या उपयोगाच्या वेळी तेलात तळून घ्याव्या.