बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. थोडं आंबट थोडं तिखट
Written By वेबदुनिया|

लाल मिरच्यांचे लोणचे

साहित्य : 2 किलो लाल मिरच्या, 1/2 चमचा ओवा 1 चमचा कालुंजी, 2 चमचे बडीशोप, 1 चमचा मेथी, 2 चमचे मोहरी, 2 चमचे आमचूर, 1/2 चमचा तिखट, 11/2 चमचे हिंगाची पूड, 1 चमचे गरम मसाला, 11/2 धने, 1 चमचा हळद, तेल अंदाजाने.

कृती : मिरच्या नेहमी देठांसकट घ्याव्यात. नंतर ओवा, कालुंजी, बडीशोप, मेथी, मोहरी व धने हे सर्व साहित्य गरम करून किंचित कुटून घ्यावेत. मिचरीच्या आतील बिया काढून त्या बिया, कुटलेले साहित्य, आमचूर, मीठ, हिंगपूड, हळद, तिखट, गरम मसाला व गोडे तेल असे एकत्र करून कालवून ते मिश्रण पोकळ मिरच्यांत भरावे. तेल तापवून गार करून, एका पातेल्यात घालावे व त्यात एक एक मिरची बुडवून घ्यावी व एका काचेच्या बरणीत त्या मिरच्या उभ्या ठेवाव्यात. मिरच्यांवर थोडे तेल घालावे.