महाराष्ट्रात कोविड-19 चे 784 नवीन रुग्ण, 1 मृत्यूची नोंद
बुधवारी महाराष्ट्रात कोविड-19 चे 784 नवीन रुग्ण आढळून आले असून यादरम्यान राज्यात संसर्गामुळे 1 मृत्यूची नोंद झाली आहे. यासह राज्यातील कोविड-19 च्या सक्रिय रुग्णांची संख्या 5,233 वर पोहोचली आहे. विशेष म्हणजे बुधवारी 1,099 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, तर राज्यातील संसर्गाचा सकारात्मक दर सध्या 9.39% आहे.
राज्यात कोविड 19 प्रभावित लोकांची संख्या 81,63,625 एवढी झाली आहे तर मृतकांचा आकडा वाढून 1,48,508 पर्यंत पोहचला आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 1.81 टक्के आहे.
देशात कोरोनाचे 9355 नवे रुग्ण
देशातील कोरोनाच्या प्रकरणांमध्ये चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की गेल्या 24 तासांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार एकाच दिवसात एकूण 9,355 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. काल म्हणजेच 26 एप्रिल रोजी एकूण 9,629 प्रकरणे नोंदवली गेली.
26 जणांचा मृत्यू
गेल्या 24 तासात एकूण 26 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. यासह कोरोनामुळे मृतांचा आकडा आता 5 लाख 31 हजार 424 वर पोहोचला आहे. देशात कोरोनाचे एकूण 4.49 कोटी रुग्ण आढळले आहेत. याशिवाय आतापर्यंत एकूण 4 कोटी 43 लाख 35 हजार 977 लोक बरे झाले आहेत.