सोमवार, 11 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 16 मार्च 2021 (07:57 IST)

राज्यात 1 लाख 30 हजार सक्रिय रुग्ण, 15,051 नवे कोरोनाबाधित

राज्यात कोरोना दररोज नव्यांन वाढ होणाऱ्या रुग्णांची संख्या 15 हजारांच्या घरात आहे. राज्यात सोमवारी 15 हजार 051 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली तर, 48 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या 1 लाख 30 हजार सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
 
आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 23 लाख 29 हजार 464 एवढी झाली आहे. त्यापैकी 21 लाख 44 हजार 743 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 10 हजार 671 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
 
राज्यात 48 रुग्णांचा मृत्यू झाला. आतापर्यत  52 हजार 909 रुग्ण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.27 टक्के एवढा आहे. तर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.07 टक्के एवढे झाले आहे. राज्यात सर्वाधिक सक्रिय रूग्णांची संख्या पुण्यात आहे. त्याखालोखाल नागपूर, मुंबई, ठाणे, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या अधिक आहे.
 
राज्यात 1 कोटी 76 लाख 09 हजार 248 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 23 लाख 29 हजार 464 सकारात्मक आले आहेत. राज्यात 6 लाख 23 हजार 121 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 6 हजार 114 संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
 
राज्यात लसीकरणाला गती देण्यात आली असून, दररोज किमान सव्वा लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येत आहे. राज्यात लसीचा तुटवडा नसून खासगी व शासकीय रुग्णालयात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याकरिता प्रयत्न केले जात आहेत. 60 वर्षांवरील सर्व नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करुन घ्यावे. संसर्गाचे प्रमाण वाढू नये म्हणून ट्रॅकींग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीनुसार काम केले जात असून राज्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. असे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले आहेत.