शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 3 जून 2021 (07:33 IST)

राज्यात 15,169 नवे रुग्ण तर 29,270 जणांना डिस्चार्ज

महाराष्ट्रात बुधवारी 15 हजार 169 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 29 हजार 270 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील आत्तापर्यंत संक्रमित झालेल्या एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 57 लाख 76 हजार 184 इतका झाला आहे.
 
आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 54 लाख 60 हजार 589 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, सध्या राज्यात 2 लाख 16 हजार 016 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
 
महाराष्ट्रात 285 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. आत्तापर्यंत 96 हजार 751 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.67 टक्के एवढा आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढला असून, सध्या 94.54 टक्क्यांवर पोहोचला आहे.
 
राज्यात आतापर्यंत 3 कोटी 55 लाख 14 हजार 594 नमूने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 16 लाख 87 हजार 643 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 7 हजार 418 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.