सोमवार, 30 जानेवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified गुरूवार, 28 जानेवारी 2021 (07:36 IST)

राज्यात २ हजार १७१ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले

राज्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी रूग्ण होण्याच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. राज्यातील कोरोनास्थितीची आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून माहिती दिली. त्यानुसार, बुधवारी एकूण २ हजार १७१ नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत. मंगळवारी दिवसभरात हा आकडा २ हजार २०४ इतका होता, पण आता मात्र रूग्णवाढीच्या वेगावर काही अंशी नियंत्रण मिळवता आलेले आहे. राज्यात ४३ हजार ३९३ सक्रिय रूग्ण आहेत. नवीन २ हजार ५५६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या १९ लाख २० हजार ००६ इतकी झाली आहे. तसेच राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.२६ टक्के इतके झाले आहे.