गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 2 जून 2021 (22:59 IST)

राज्यात कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये किंचित वाढ, तर 285 मृत्युमुखी

महाराष्ट्रात कोरोना विषाणूची 15169 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत. यासह, राज्यात गेल्या 24 तासात कोरोना विषाणूमुळे 285 लोकांचा मृत्यू झाला आहे. नव्या घटनेच्या तुलनेत जवळपास दुप्पट लोक बरे झाले आहेत ही दिलासाची बाब आहे. मंगळवारच्या तुलनेत राज्यात कोरोना विषाणूच्या नवीन घटनांमध्ये किंचित वाढ झाली आहे.
 
आरोग्य विभागा कडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी राज्यात कोरोनामुळे 29,270 लोक बरे झाले आहेत. यासह राज्यातील कोरोना विषाणूचा  रिकव्हरी दर 94.54 टक्क्यांवर पोहोचला आहे.सध्या राज्यात 16,87643 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 7418लोक संस्थेच्या अंतर्गत वेगळे ठेवण्यात आले आहेत.
मंगळवारी राज्यात कोरोना विषाणूचे 14,123 नवीन रुग्ण आढळले तर 477 लोकांचा बळी गेला.
त्याचवेळी मुंबई हायकोर्टाने बुधवारी म्हटले आहे की, केंद्राने महाराष्ट्रात पाठविलेले कोणतेही व्हेंटिलेटर सदोष असतील तर ते बदलले जावेत. कोविड -19 च्या रूग्णांवर अशे व्हेंटिलेटर वापरण्यास परवानगी देऊ शकत नाही, असे कोर्टाने आवर्जून सांगितले. 
कोविड -19 साथीच्या रोगासंदर्भात विविध विषयांवर दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती आर.व्ही. गुगे आणि न्यायमूर्ती बी.यू. देबद्वार यांनी गेल्या आठवड्यात राज्य सरकारतर्फे बाजू मांडत फिर्यादी डी.आर. काळे यांनी कोर्टाला सांगितले होते की, मराठवाड्यातील रुग्णालयांना केंद्राकडून पुरविण्यात येणाऱ्या  100 हून अधिक व्हेंटिलेटर सदोष असून त्यामुळे ते वापरता येणार नाहीत.