शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 30 मे 2020 (16:42 IST)

कोरोना पॉझिटिव्ह महिलांची प्रसुती, सुदैवाने १९६ नवजात बाळं सुखरूप

मुंबईत २४ तासात १९२ कोरोना पॉझिटिव्ह महिलांची प्रसुती झाली मात्र सुदैवाने १९६ नवजात बाळं सुखरूप असून ते सर्व कोरोना निगेटिव्ह आहेत. मुंबई महापालिकेच्या नायर रुग्णालयात प्रसुती झालेल्या १९२ महिलांची टेस्ट कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. मात्र सुदैवाने १९६ नवजात बाळांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्यानंतर त्यांचा 
कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. आई कोरोना पॉझिटिव्ह असूनही हे सर्व बालक सुखरूप असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
मुंबई सेंट्रल येथे असलेल्या नायर रुग्णालयात गेल्या २४ तासात १९२ कोरोना पॉझिटिव्ह महिलांची प्रसुती झाली असून त्यांनी १९६ बाळांना जन्म दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या महिलांना कोरोना असल्याने रुग्णालय प्रशासनाकडून बाळांची कोरोना चाचणी करण्यात आली. सुदैवाने यातील एकाही बाळाला कोरोनाची लागण झालेली नाही, असे रुग्णालय प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. यापैकी १३८ जणांना रुग्णालयातून डिस्चार्जही देण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
 
मुंबईतील नायर रुग्णालयात १४ एप्रिलपासून आतापर्यंत जवळपास ३२५ कोरोना पॉझिटिव्ह माता वेगवेगळ्या कारणांनी दाखल झाल्या असून त्यापैकी काहींची प्रसुती झाली तर काही महिलांवर उपचार सुरू आहेत.