नवोदय विद्यालयात कोरोना स्फोट, आणखी 33 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर गावात असलेली निवासी शाळा ही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नवोदय विद्यालय नेटवर्कचा भाग आहे. येथील एका शाळेत 33 विध्यार्थ्यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे आढळून आले आहे. जिल्हा अधिकाऱ्याने सांगितले की, शाळेत 5वी ते 12वी पर्यंत 450 विद्यार्थी आहेत. शाळेत शिकणाऱ्या 450 विद्यार्थ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी पूर्वी 19 विद्यार्थ्यांचा कोरोनाच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता . जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले म्हणाले की, सर्व 450 नमुन्यांचे विश्लेषण अद्याप सुरू आहे. त्यापैकी आज विद्यालयात पुन्हा 33 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. आता या शाळेत कोरोना बाधित विद्यार्थ्यांची एकूण संख्या 52 झाली