गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 26 मे 2021 (07:34 IST)

लखनऊमध्ये पाण्यात सापडला कोरोनाचा विषाणू, तीन ठिकाणांहून गोळा करण्यात आले होते नमुने

उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये आणखी धोका निर्माण झाला आहे. आयसीएमआर आणि डब्ल्यूएचओ यांनी मृतदेह विविध नद्यांमध्ये बुडल्यानंतर देशव्यापी अभ्यास घेण्याची योजना आखली. त्याअंतर्गत देशभरात 8 केंद्रे बांधली गेली. उत्तर प्रदेशचे केंद्र एसजीपीजीआयला देण्यात आले होते. लखनौमध्ये सर्वाधिक कोरोना विषाणू बाधित लोक आढळले आहेत. अशा परिस्थितीत येथे सांडपाणी नमुना चाचणी करण्याचे नियोजन होते. एसजीपीजीआयच्या सूक्ष्म जीवशास्त्र विभागाने तीन ठिकाणांहून सीवरेजचे नमुने घेऊन तपासणी केली. कोरोना विषाणूचा नमुना सापडला आहे. अशा परिस्थितीत पाण्याची लागण झाल्यास नवीन अभ्यास केला जाण्याची शक्यता आहे. एसजीपीजीआयचे मायक्रोबायोलॉजी विभाग प्रमुख प्राध्यापक उज्ज्वला घोषाळ म्हणाले की, भविष्यात संपूर्ण राज्यासाठी प्रकल्प तयार होऊ शकेल.
 
डॉ उज्ज्वला यांनी असे म्हटले आहे की, पाण्यात सापडलेल्या कोरोना व्हायरसचे सर्व रिपोर्ट ICMR कडे सोपवण्यात आले आहे. पाण्यात व्हायरस मिळण्याचे कारण सांडपाणी आहे. कोरोनाच्या काळात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असताना वाहून आलेल्या सांडपाण्यात व्हायरसचे संक्रमण झाले आहे. अर्ध्याहून अधिक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे त्यांच्या वाहून आलेल्या सांडपाण्यात कोरोना व्हायरस सापडला आहे. पाण्यात वाहून आलेल्या मृतदेहांमुळे पाण्यात व्हायरस मिळाल्याची कोणताही माहिती देण्यात आलेली नाही
 
SGPI ने सांडपाण्याचे नमुने लखनऊच्या खद्रा परिसरातील रुकपूर, दुसरे घंटाघर आणि मछली मोहाल या तीन ठिकाणांहून घेण्यात आले होते. या तीन ठिकाणी संपूर्ण परिसरातील सांडपाणी वाहून एका ठिकाणी येते. १९ मे रोजी सांडपाण्याचे नमुने गोळा करण्यात आले होते. सध्या ICMR आणि WHO कडे रिपोर्ट पाठवण्यात आले आहेत. हे अध्ययन प्राथमिक आहे. या विषयाचा भविष्यात सखोल अभ्यास केला जाणार आहे. पाण्यातून कोरोनाचा संसर्ग पसरतो की नाही हा संशोधनाचा विषय आहे. येणाऱ्या काळात अभ्यास आणि संशोधनाच्या आधारे पाण्यातून कोरोना व्हायरस पसरतो का हे सिद्ध होईल,असे डॉ. उज्ज्वला यांनी म्हटले आहे.