शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मुंबई , गुरूवार, 30 एप्रिल 2020 (06:33 IST)

Coronavirus : धारावीत १४ नवे रुग्ण; एकूण रुग्णसंख्या ३४४ वर

मुंबईतील धारावीत १४ नवे कोरोनाग्रस्त आढळले आहे. त्यामुळे धारावीत आता रुग्णसंख्या आता ३४४ पर्यंत पोहोचली आहे. महापालिका अधिकाऱ्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. तसंच धारावीत आतापर्यंत एकूण १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

धारावीत महापालिकेने आतापर्यंत ७० हजार नागरिकांची कोरोनाची चाचणी केली आहे. मात्र असं असलं तरी धारावीतील ९० फिट रोड, ६० फिट रोड, माटुंगा लेबर कॅम्प, कोळीवाडा, कुट्टीवाडी, धोरवाडा, ट्रान्झिस्ट कॅम्प, कुंची कुरवी नगर आदी भागांत कोरोनाचे नवे रुग्ण आढळल्याची माहिती मिळाली आहे.