मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 9 एप्रिल 2022 (16:45 IST)

कोविशिल्ड 225 रुपयांना, उद्यापासून 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना बूस्टर डोस मिळणार

covishield-vaccine
उद्यापासून म्हणजेच 10 एप्रिल 2022 पासून 18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना बूस्टर डोस घेता येणार आहे. भारत सरकारच्या सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं याबाबतचं पत्रक काढत घोषणा केलीय.
 
कोव्हिडवरील लशीचा दुसरा डोस घेतल्याला 9 महिने पूर्ण झाल्यानंतरच बूस्टर डोस घेता येणार आहे.
 
हा बूस्टर डोस केवळ खासगी लसीकरण केंद्रांवर उपलब्ध असेल, अशीही माहिती केंद्रीय मंत्रालयानं दिलीय.
 
आतापर्यंत 2.4 कोटी बूस्ट डोस हे आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 हून अधिक वय वर्षं असलेल्यांना देण्यात आले आहेत.
 
सध्या सरकारी लसीकरण केंद्रावर आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60 हून अधिक वय वर्षं असलेल्या व्यक्तींना बूस्टर डोस देण्यात येत आहे आणि ही प्रक्रिया सुरू राहणार आहे.
 
भारतातील 15 वर्षांवरील 96 टक्के व्यक्तींनी आतापर्यंत लशीचा एक डोस, तर 83 टक्के व्यक्तींनी लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत.
 
कोव्हिशिल्ड लशीची किंमत 600 वरून 225 रुपयांवर आणण्याचा निर्णय झाल्याचं आदर पुनावाला यांनी जाहीर केले आहे.