शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 13 जून 2020 (16:38 IST)

रेल्वेकडून कोरोना रुग्णांसाठी पाच हजार २३१ विशेष डबे

कोरोनाबाधिक रुग्णांसाठी आता रेल्वेची मदत होणार आहे. रुग्णांसाठीची स्थानिक यंत्रणा कमी पडेल त्याठिकाणी या रेल्वे पाठवण्यात येतील,असे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले.
 
रेल्वेने कोविड-१९ च्या रुग्णांसाठी  पाच हजार २३१ विशेष डबे निर्माण केले आहेत. प्रत्येक डब्यात १६ रुग्णांना ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वे प्रत्येक डब्यात १६ असे दहा डबे एका गाडीला जोडून आवश्यक त्या ठिकाणी पाठवण्यात येणार आहेत, तशी माहिती रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे.
 
तेलंगणाने कोविड-१९ रुग्णांच्या विलगीकरणासाठी तीन रेल्वेगाड्या मागवल्या आहेत. उत्तर प्रदेश सरकारने या गाड्यांसाठी २४  विविध स्थानके निश्चित केली आहेत, तर दिल्लीत दहा रेल्वेगाड्यांमधून रुग्णांची सोय करण्यात येणार आहे. रुग्णांसाठीची स्थानिक यंत्रणा कमी पडेल त्याठिकाणी या रेल्वे पाठवण्यात येतील, असे रेल्वे मंत्रालयानं स्पष्ट केले.