शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 मे 2021 (22:51 IST)

दिलासादायक बातमी! राज्यात 40 हजारांपेक्षा कमी प्रकरणे,परंतु मृत्युमुखींचा आकडा काळजीत टाकणारा.

महाराष्ट्रात कोरोना विषाणूची नवीन प्रकरणे रोज कमी होत आहेत. तथापि, मृत्यूची संख्या निश्चितच राज्य सरकारसाठी चिंतेचे कारण बनली आहे. शुक्रवारी राज्यात 40 हजारांहून कमी नवीन रुग्ण आढळले आहेत, तर मुंबईत 1,657 नवीन रुग्ण आढळले आहेत. हा सलग सहावा दिवस आहे जेव्हा महाराष्ट्रात 50 हजारांहून कमी रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोनाचे 39,923 नवीन रुग्ण आढळले आहे.तर या कालावधीत 53,249 रुग्ण रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. त्याच वेळी या काळात सुमारे 695 लोकांनी  प्राण गमावले. 
महाराष्ट्रात एकूण आकडेवारी आतापर्यंत 53,09,215 वर पोचली आहे, तर मृतांचा आकडा 79,552 वर पोहोचला आहे.सध्या 5,19,254 सक्रिय प्रकरणे आहेत. त्याचबरोबर मुंबईत गेल्या एका दिवसात 2,572 लोक बरे झाले आहेत. शहरातील एकूण सक्रिय प्रकरणे 37,656 वर गेली आहेत. 199 दिवसांत प्रकरणे दुप्पट होत आहेत.
गुरुवारी राज्यात 42582 नवीन प्रकरणे आढळली. तसेच 24 तासात कोरोना विषाणूमुळे 850 लोकांचा मृत्यू झाला. यासह राज्यात संक्रमणामुळे एकूण मृत्यू 78,857 वर पोचला. सध्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने देशात खळबळ उडाली आहे. त्या मुळे महाराष्ट्र सर्वाधिक प्रभावित राज्य आहे. यापूर्वी बुधवारी 46781 नवीन प्रकरणे आणि 816 मृत्यू आहेत. त्याचबरोबर मंगळवारी राज्यात 40956 आणि सोमवारी 37236 नवीन प्रकरणे नोंदली गेली.