रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020 (08:56 IST)

सिरो सर्वेक्षण, नागपूर शहरातील ४९.७ टक्के लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार

नागपूरमध्ये सिरो सर्वेक्षणात शहरातील ४९.७ टक्के तर ग्रामीणमधील २१.७ टक्के लोकांच्या शरीरात अँटीबॉडीज म्हणजे रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचे समोर आले आहे. मेडिकलने विभागीय आयुक्तांना सर्वेक्षणाचा अहवाल सादर केला.
 
पीएसएम विभागाने ग्रामीणमधील १३ तालुक्यातील २ हजार तर महानगरपालिकेच्या १० झोनमधील २ हजार लोकांचे रक्तांचे नमुने घेऊन तपासले. यात प्राप्त माहितीनुसार, नागपूरच्या सहा विधानसभा क्षेत्रापैकी पूर्व नागपुरातील लोकांमध्ये अँटीबॉडीज वाढलेल्यांची संख्या अधिक असल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. विशेषत: महानगरपालिकेच्या नेहरूनगर, आशीनगर, गांधीबाग व सतरंजीपुरा या भागातील दाट वस्त्यांमध्ये अँटीबॉडीज वाढलेले मोठ्या संख्येत लोक आढळून आले.
 
या सर्वेक्षणातून एक गोष्ट समोर आली आहे की, झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांमध्ये अ‍ँटीबॉडीज तयार होण्याचे प्रमाण सामान्य व पॉश वसाहती राहणाऱ्या लोकांपेक्षा तिप्पट आहे. शहरांमध्ये २००० लोकांमधून साधारण १००० लोकांमध्ये अँटीबॉडीज वाढले असल्याचे दिसून आले. यावरून यातील एकाही व्यक्तीला लक्षणे आढळून आली नसल्याने त्यांनी कोविडची तपासणी केली नाही.