शनिवार, 21 सप्टेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 22 डिसेंबर 2021 (09:15 IST)

राज्यात ११ नवीन ‘ओमायक्रॉन’बाधित आढळले

राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण जरी कमी झाल्याचे दिसत असले, तरी देखील आता ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडताना दिसत आहे.  राज्यात ११ नवीन ‘ओमायक्रॉन’बाधित आढळले. यामुळे राज्यातील आतापर्यंतची एकूण बाधितांची संख्या ६५ वर पोहचली आहे.आज आढललेल्या ११ ‘ओमायक्रॉन’बाधितांमध्ये ८ जण हे मुंबई विमानतळावरील स्क्रीनिंग दरम्यान आढळले. तर, पिंपरी-चिंचवड, उस्मानाबाद आणि नवी मुंबई येथे प्रत्येकी एक रूग्ण आढळून आला.
 
आजपर्यंत आढळून आलेल्या ६५ ‘ओमायक्रॉन’बाधितांपैकी ३४ जणांची आरटीपीसआर टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.याशिवाय आज दिवसभरात राज्यात ८२५ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली. तर, ७९२ रूग्ण करोनामुक्त झाले असून, १४ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. राज्याचा मृत्यू दर २.१२ टक्के आहे. तर, आजपर्यंत राज्यात ६४,९८,८०७ रूग्ण करोनामुक्त झालेले असून, राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.७१ टक्के आहे.
 
करोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी करण्यात आलेल्या ६,७८,८३,०६१ प्रयोगाशाळा नमुन्यांपैकी आजपर्यंत ६६,५०,९६५ नमूने हे कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत. सद्यस्थितीस राज्यात ७३,०५३ जण गृह विलगिकरणात असून, ८६४ जण संस्थात्मक विलगिकरणात आहेत.