बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 1 डिसेंबर 2021 (21:20 IST)

ओमिक्रॉनवर कोविशील्ड प्रभावी आहे की नाही? अदार पूनावाला यांनी दिली महत्वाची माहिती

दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या ओमिक्रॉनच्या धोक्यामुळे भारतासह अनेक देशात भीती सह पुन्हा खळबळ उडाली आहे.आता तर कोरोना प्रतिबंदक  लशींचे दोन डोस घेतल्यानंतर कदाचित आता आणखी नवीन लशीचे डोस घ्यावे लागतील सोबतच  बूस्टर डोस देखील देण्यात येतील, यासाठी आम्ही संशोधन सुरु केल आहे.  असे भारतात कोविडशील्ड लस बनवणारी कंपनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे प्रमुख अदार पूनावाला यांनी म्हटले आहे.
अदार पूनावाला म्हणाले की, ओमिक्रॉनच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर गरज भासल्यास नवीन कोरोना प्रकारासाठी खास बनवलेली कोविशील्ड लस बनवण्याचा विचार केला जाऊ शकतो. तसेच कोविडशील्ड लस नवीन प्रकाराविरूद्ध किती प्रभावी आहे हे येत्या २-३ आठवड्यांत कळेल. तसेच आवश्यक असल्यास, ओमिक्रॉन लक्षात ठेवून बूस्टर डोस देखील शक्य आहे.
तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ देखील संशोधन करत आहेत, त्यांच्या संशोधनाच्या आधारे आम्ही एक नवीन लस बनवण्याचा विचार करू शकतो, ती बूस्टर डोस म्हणून काम करेल. संशोधनाच्या आधारे, आम्ही लसीचा तिसरा आणि चौथा डोस देण्याबाबत निर्णय घेण्याचा घेऊ. तथापि, त्यांनी हे देखील स्पष्ट केले की ओमिक्रॉन प्रकाराशी लढण्यासाठी विशिष्ट लस आवश्यक आहे, आवश्यक नाही.
पूनावाला पुढे म्हणाले की, बूस्टर डोसची आवश्यकता असल्यास, कंपनीकडे आधीच पुरेसे डोस असून ते त्याच म्हणजे पूर्वीच्या किंमतीत दिले जातील. आमच्याकडे लाखो डोस स्टॉकमध्ये आहेत. आम्ही भारतातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी २० कोटी डोस आरक्षित केले आहेत. त्याचप्रमाणे जर सरकारने बूस्टर डोस जाहीर केला, तर आमच्याकडे पुरेशा प्रमाणात लसी आहेत. तथापि, सध्या प्राधान्याने कोरोना लसीचा दुसरा डोस न घेणाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करणे आवश्यक आहे.
लगेचच बूस्टर डोस लागू करण्याची कोणतीही योजना नसल्याचे सरकारने सध्यातरी स्पष्ट केले आहे. याबाबत केंद्राच्या कोरोना समितीचे प्रमुख एन.के. अरोरा म्हणाले होते की, भारत आणि युरोप-उत्तर अमेरिकन देशांमध्ये परिस्थिती सारखी नाही. आपल्या लोकसंख्येच्या मोठ्या संख्येने कोरोना संसर्ग झाला आहे. मात्र लस अतिरिक्त संरक्षण प्रदान करत आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, सध्या अस्तित्वात असलेल्या लशी ओमिक्रॉन विरूद्ध काही संरक्षण प्रदान करणार नाहीत, असा कोणताही पुरावा नाही.