रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020 (16:29 IST)

राज्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची शक्यता नाही : टोपे

राज्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची शक्यता नाही. तरीही राज्य शासनाने त्याबाबत पूर्णपणे खबरदारी घेतली आहे. दिवाळीनंतर राज्यातील मंदिरे उघडण्याबाबत राज्य शासन अनुकूल आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री जाहीर करतील, असे त्यांनी सांगितले.
 
राज्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी असल्याचे मत राजेश टोपे यांनी व्यक्‍त केले आहे. मात्र दुसरी लाट आलीच तर अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्य सरकारची पूर्ण तयारी आहे, असेही   टोपे यांनी सांगितले.
 
दिवाळी तोंडावर असून लोक खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. लॉकडाऊन शिथिल केल्याने आणि त्यामध्ये आणखी सवलती देण्याची तयारी सरकारने केल्याने राज्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांनी हे वक्‍तव्य केले आहे.  मंत्रिमंडळासमोर जे सादरीकरण झाले, त्यामध्ये आरोग्य विभागाच्या सचिवांनी महाराष्ट्र आणि आपल्या देशात दुसरी लाट येण्याची शक्यता फार कमी असल्याचे सांगितले आहे.  मात्र सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणे, हात सॅनिटाईझ करणे या गोष्टी पाळाव्याच लागणार आहेत, असे टोपे म्हणाले.