शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 28 एप्रिल 2020 (17:04 IST)

१० मे पर्यंत परीक्षांचं चित्र स्पष्ट होईल : सुप्रिया सुळे

येत्या दोन आठवड्यांमध्ये म्हणजेच १० मे पर्यंत राज्यातील परीक्षांचं चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला.
 
“सध्या लॉकडाउनमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी बोनस वेळ मिळाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास सुरूच ठेवावा. येत्या १० मे पर्यंत परीक्षांबाबत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल. मंत्री उदय सामंत यांच्याशी या विषयावर चर्चा झाली आहे. ते यावर काम करत आहेत आणि लवकरच सर्वांसमोर चित्र स्पष्ट होईल,” असं सुळे यावेळी म्हणाल्या.