शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 12 जुलै 2021 (08:29 IST)

सलग दुसऱ्या दिवशी बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नवे रुग्ण अधिक

महाराष्ट्रात नव्यानं वाढ होणा-या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक होती. मात्र, रविवारी सलग दुसऱ्या दिवशी राज्यात बरे झालेल्या रुग्णांपेक्षा नवे रुग्णांची संख्या अधिक नोंदवली आहे. यामुळे सक्रिय रुग्ण संख्येत देखील वाढ झाली आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात  8 हजार 535 नव्या रुग्णांची नोंद झाली. यासह महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 61 लाख 57 हजार 799 एवढी झाली आहे. त्यापैकी 59 लाख 12 हजार 479 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 6 हजार 013 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
राज्यातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून सध्या 1 लाख 16 हजार 165 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

महाराष्ट्रात आज 156 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 25 हजार 878 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.03 टक्के एवढा झाला आहे.राज्याचा रिकव्हरी रेट 96.02 एवढा आहे.

राज्यात आतापर्यंत 4 कोटी 40 लाख 10 हजार 550 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 96 हजार 279 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 4 हजार 672 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.