शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: रविवार, 16 मे 2021 (10:11 IST)

यूपीएससी परीक्षा पास केलेल्या प्रांजल नाकटचा कोरोनामुळे मृत्यू

नुकतीच केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) परीक्षा पास केलेल्या प्रांजल नाकट या अकोल्यातील तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
 
कोरोनाची लागण झाल्यानंतर फुफ्फुसं बाधित झाल्याने प्रांजलला हैद्राबाद येथे उपचारासाठी नेण्यात आलं होतं. याठिकाणी यशोदा हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान प्रांजलचा मृत्यू झाला.
प्राजंल नाकट हा अकोल्या जिल्ह्यातील तांदळी बुजरूक गावातील रहिवासी होता. त्याने यूपीएससी परीक्षा पास केल्यानंतर जिल्हाधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण होणार म्हणून संपूर्ण गावात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. तलाठ्याच्या मुलाने यूपीएससीसारख्या परीक्षेत यश मिळवल्याने आई-वडिलांचाही आनंद गगनात मावेनासा झाला. पण हा आनंद पूर्ण होण्याआधीच नाकट कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला.
 
6 मे रोजी प्रांजलला एअर अँब्यूलंसने हैद्राबादला हलवण्यात आलं. त्याची फुफ्फुसं निकामी होत होते. उपचापरासाठी 55 लाख रुपयांची आवश्यकता होती. त्याचीही जुळवाजुळव कुटुंबियांनी समाज, नातेवाईक आणि मित्र परिवाराकडून केली होती. पण शनिवारी (15 मे) त्याचा मृत्यू झाला.