बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 11 सप्टेंबर 2021 (22:56 IST)

काही दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्येची शनिवारी नोंद

राज्यात करोना रुग्णसंख्या कमी झाल्याचं दिसत आहे. राज्यात शनिवारी ३ हजार ७५ रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसातील सर्वात कमी रुग्णसंख्या शनिवारी  नोंदवली गेली आहे. दुसरीकडे ३ हजार ५६ रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६३ लाख २ हजार ८१६ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७.०५ टक्के इतकं झालं आहे. राज्यात दिवसभरात ३५ करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा २.१२ टक्के इतका आहे. राज्यात आता ४९ हजार ७९६ रुग्ण सक्रीय आहेत.
 
राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ५८ लाख ३६ हजार १०७ रुग्णांपैकी ६४ लाख ९४ हजार २५४ जणांना करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे करोना पॉझिटिव्ह येण्याचं प्रमाण हे ११.६३ टक्के इतकं आहे. सध्या राज्यात २ लाख ९५ हजार ७७२ रुग्ण होमक्वारंटाइनमध्ये आहेत. तर १,९५४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.