1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 4 ऑगस्ट 2021 (08:12 IST)

राज्यातील ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या 75 हजारांच्या खाली

महाराष्ट्रात मंगळवारी 6 हजार 5 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर, 6 हजार 799 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.राज्यातील ॲक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून, ती 75 हजारांच्या खाली आली आहे.
 
आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 63 लाख 21 हजार 068 एवढी झाली आहे. त्यापैकी 61 लाख 10 हजार 124 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 96.66 टक्के एवढा झाला आहे. राज्यात सध्या 74 हजार 318 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात आज 177 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 33 हजार 215 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.10 टक्के एवढा झाला आहे.
 
राज्यात आतापर्यंत 4 कोटी 85 लाख 32 हजार 523 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 51 हजार 971 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 3 हजार 009 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्रात सोमवारपर्यंत 4 कोटी 50 लाख 05 हजार 929 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. सोमवारी (दि.2) राज्यात 3 लाख 23 हजार 452 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.