सोमवार, 11 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 6 जुलै 2021 (09:03 IST)

राज्यात नव्या रुग्णापेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट

महाराष्ट्रात नव्या रुग्णापेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या दुप्पट आहे. सोमवारी  6 हजार 740 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तर, 13 हजार 027 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 58 लाख 61 हजार 720 रुग्ण उपचारानंतर बरे झाले.
 
आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 61 लाख 04 हजार 917 एवढी झाली आहे. सध्याच्या घडीला राज्यात 1 लाख 16 हजार 827 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
 
महाराष्ट्रात  51 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 23 हजार 136 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.01 टक्के एवढा झाला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढून 95.91 एवढा झाला आहे. राज्यात आतापर्यंत 4 कोटी 27 लाख 12 हजार 460 नमूने तपासण्यात आले.