रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 27 एप्रिल 2020 (11:52 IST)

तीन वर्षांची चिमुकली पालघर जिल्ह्यातील पहिली करोनामुक्त व्यक्ती

पालघर जिल्ह्यातून एक दिलासादायक बातमी आहे की येथे एका तीन वर्षांच्या चिमुकलीने करोनावर मात केली आहे. ही चिमुकली करोनामुक्त होणारी पालघर जिल्ह्यातील पहिली व्यक्ती ठरली आहे.
 
डहाणू तालुक्याच्या गंजाड परिसरातील दसरापाडा येथील तीन वर्षीय मुलगी करोनामुक्त झाल्याने रविवारी तिला डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून तिला आनंदी वातावरणात निरोप दिला. चिमुकलीच्या ‍तीन वेळे केलेल्या चाचण्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर तिला घरी सोडण्यात आले. 
 
माहितीप्रमाणे या चिमुकलीच्या संपर्कात आलेल्या 224 जणांची करोना चाचणी घेण्यात आली. त्यातील सात जणांना करोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.