रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 20 एप्रिल 2020 (07:18 IST)

जनधन योजनेअंतर्गत १९.८६ कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार लॉकडाऊनच्या काळात लोकांची आर्थिक कोंडी होऊ नये याकरता सरकारी काही योजना राबवल्या होत्या. त्यापैकी ३६ हजार ६५९ कोटी लाभार्थ्यांच्या थेट खात्यात जमा केल्याची माहितीतसेच, १९.८६ कोटी महिला लाभार्थ्यांच्या जन–धन खात्यात प्रत्येकी ५०० रुपये जमा केल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली.

रोख लाभ थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा झाल्याने मध्यस्थाकडून होणारी फसवणूक टाळता येते. ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने’ अंतर्गतही काही रक्कम देण्यात आली. महिला खातेदारांच्या जन-धन खात्यात प्रत्येकी 500 रुपये जमा झाले आहेत. 13 एप्रिलपर्यंत एकूण महिला लाभार्थ्यांची संख्या 19.86 कोटी होती. अशाप्रकारे 9 हजार 930 कोटी रुपये वितरित झाल्याचं अर्थ मंत्रालयाने सांगितलं. ‘कोरोना’मुळे भारत सरकारतर्फे देण्यात आलेल्या विविध मुदतवाढीचा करदात्यांना पूर्ण लाभ घेता यावा, यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी) 2020-2021 या आर्थिक वर्षाच्या रिटर्न (परतावा) फॉर्ममध्ये बदल करत आहे महिन्याच्या शेवटी याविषयी अधिसूचित केले जाईल.