उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेया
उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेया ॥ध्रु॥
जो अनसूयेच्या भावाला भुलूनिया सुत झाला,
दत्तात्रेय अशा नामाला मीरवी वंद्य सुरांना,
तो तू मुनीवर्या, निज पाया, स्मरता वारीसी माया ||१||
जो माहुरपूरी शयन करी,
सह्याद्रीचे शिखरी निवसे गंगेचे स्नान करी,
भिक्षा कोल्हापूरी स्मरता दर्शन दे,
वारी भया, तो तू आगमगेया ||२||
तो तू वांझेसी सुत देसी सौभाग्या वाढविसी
मरता प्रेतासी जीववीसी सद्वरदाना देसी
यास्तव वासुदेव तव पाया दरत्या तारी सदया
उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेया||३||