रविवार, 5 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Updated : सोमवार, 17 ऑक्टोबर 2022 (17:14 IST)

Dhanteras 2022 धनत्रयोदशी कधी आहे ? 22 ऑक्टोबर की 23 ऑक्टोबर रोजी ?

dhanteras 2022
धनत्रयोदशीबाबत संभ्रम आहे. यावेळी अश्विन महिन्यातील अमावास्येला सूर्यग्रहणामुळे दिवाळीचा सण 25 ऐवजी 24 ऑक्टोबरला साजरा होणार आहे. यावरून धनत्रयोदशीची तारीखही बदलली आहे. तर जाणून घ्या यंदा 2022 मध्ये धनत्रयोदशी कधी आहे हे- 
 
धनत्रयोदशी 2022 कधी आहे | धनतेरस 2022 कधी आहे
 
धनतेरस हा सण तेरस म्हणजेच आश्विन महिन्याच्या 13 व्या दिवशी दिवशी साजरा केला जातो. या वेळी द्वादशी तिथी 22 तारखेला शनिवारी सायंकाळी 6.02 वाजेपर्यंत राहील. नंतर त्रयोदशीला सुरुवात होईल. त्रयोदशी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 06.03 पर्यंत राहील.
 
अशा स्थितीत काही लोक 22 तारखेला धनत्रयोदशी साजरी करतील तर काही लोक रविवारी 23 ऑक्टोबर रोजी साजरी करतील.
 
अनेक जाणकारांच्या मते धनत्रयोदशी 23 ऑक्टोबरला आहे. 23 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीला उगवण्याची तिथी म्हणून साजरी करणे अधिक योग्य आहे.