मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: सोमवार, 1 नोव्हेंबर 2021 (22:53 IST)

गणेश-लक्ष्मीची मूर्ती घरी आणताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हाही तुम्ही गणेश-लक्ष्मीची मूर्ती विकत घेता तेव्हा ती वेगळी नसावी, तर दोन्हीच्या एकत्रित मूर्तीची पूजा करणे शुभ मानले जाते. 
 
आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे दिवाळीच्या दिवशी गणेश-लक्ष्मीच्या बसलेल्या मूर्तीचीच पूजा करावी. कधीपण अशी मूर्ती घरता आणू नका ज्यात देवता उभे आहेत. अशी मूर्ती शुभ मानली जात नाही आणि त्यामुळे घरात संकटे येतात.
 
बाजारपेठेत गर्दी असल्याने घाईघाईने खरेदी करताना काही वेळा मूर्ती खंडित होऊ शकते. अशा वेळी हे लक्षात ठेवा की कोणत्याही परिस्थितीत तुटलेली मूर्ती घरात आणू नका कारण तुटलेल्या मूर्तीची पूजा करणे अशुभ मानले जाते. याशिवाय गणेशाच्या मूर्तीमध्ये त्यांची सोंड डावीकडे वळलेली असावी आणि त्या मूर्तीमध्ये उंदीर असावा हे लक्षात ठेवा.
 
जर तुम्ही गणेश-लक्ष्मीची मूर्ती विकत घेत असाल तर लक्षात ठेवा की हातात लाडू घेऊन गणेशमूर्तीची पूजा करणे खूप सुखदायक मानले जाते. तसेच लक्ष्मीची मूर्ती विकत घेताना लक्षात ठेवा की तिच्या हातातून नाणी पडत आहेत. माँ लक्ष्मीला धनाची देवी म्हटले जाते आणि जर तुम्ही घरामध्ये धन लक्ष्मीची पूजा केली तर ते खूप शुभ होईल.
 
प्लास्टिकच्या मूर्तीची पूजा अशुभ
याशिवाय घुबडाऐवजी हत्ती किंवा कमळावर विराजमान लक्ष्मीजींच्या मूर्तीची पूजा करणे फायदेशीर मानले जाते. दिवाळीत मातीच्या मूर्तीची पूजा करणे शुभ मानले जाते हेही लक्षात ठेवा. याशिवाय अष्टधातू, चांदी किंवा पितळेच्या मूर्तीचीही पूजा करू शकता. पण लक्षात ठेवा की घरामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिस किंवा प्लास्टिकच्या मूर्तीची पूजा करू नये.