शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: मंगळवार, 10 नोव्हेंबर 2020 (15:01 IST)

धनतेरससाठी आणलेली भांडी रिकामे ठेवू नका, या 7 गोष्टी तातडीने ठेवा

प्रत्येक सणाप्रमाणे धनतेरस साजरा करण्याच्या मागे देखील एक आख्यायिका आहे. हिंदू धर्मग्रंथाच्यानुसार, ज्यावेळी क्षीरसागराचे मंथन होतं होते त्या वेळी धन्वंतरी अमृताचे घट घेऊन प्रकटले होते. म्हणूनच धनतेरस हा आनंदाचा आणि समृद्धीचा सण म्हणून साजरा केला जातो. 

धर्मग्रंथानुसार, समुद्रमंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी प्रकट झाले म्हणून या दिवसाला धनत्रयोदशी म्हणतात. 
 
धनतेरसच्या दिवशी सोनं, चांदी किंवा नवी भांडी विकत घेणं शुभ मानले जातात. परंतु या दिवशी लोखंडी भांडी आणि त्यापासून बनवलेल्या वस्तुंना विकत घेणं टाळावं. धनतेरसला लोक स्टीलची भांडी विकत घेतात पण स्टील देखील लोखंडाचेच रूप आहे म्हणून धनतेरसला स्टीलची भांडी विकत न घेण्याचा सल्ला दिला जातो. स्टील आणि लोखंडाच्या व्यतिरिक्त काचेची भांडी देखील विकत घेणे टाळावे. धनतेरसच्या दिवशी समृद्धीचे प्रतीक म्हणून या वस्तू घेणं शुभ मानतात. - सोनं, चांदी धातूंच्या बनलेल्या लक्ष्मी-गणपतीची मूर्ती, नवी भांडी.
 
* पितळ किंवा चांदीची भांडी विकत घेणं शुभ असत - 
भगवान धन्वंतरी हे नारायणाचे भगवान विष्णूचे रूप मानतात. यांना चार हात आहे. या मधील दोन हातात ते शंख आणि चक्र घेतलेले आहे. दुसऱ्या दोन्ही हातात औषधासह अमृत कलश घेऊन आहे. असे मानतात की हा अमृत कलश पितळ्याचा बनलेला आहे कारण पितळ हे भगवान धन्वंतरीची आवडती वस्तू आहे. म्हणून धनतेरसच्या दिवशी पितळ्याची खरेदी अधिक फलदायी मानली जाते.
 
रिकामी भांडी आणू नये -
धनतेरसच्या दिवशी चांदीची भांडी विकत घेणं शुभ मानतात पण भांडी विकत घेताना काही सावधगिरी बाळगणे महत्त्वाचें असते. 
 
* घरात कधीही रिकामी भांडी घेऊन येऊ नये. घरात आणल्या वर याला पाण्याने भरावे. पाण्याला नशिबाशी जोडून बघतात. या मुळे आपल्या घरात समृद्धी आणि भरभराट राहते.
 
* रिकामी भांडी घरात आणणं अशुभ मानतात म्हणून असे करू नये.
 
* भांडी घरात आणल्यावर त्यामध्ये साखर भरू शकतो. जेणे करून समृद्धी टिकेल.
 
* भांडयात पांढरे तांदूळ भरू शकतो. या मुळे भाग्य उजळतं.

* यामध्ये दूध देखील ठेवू शकतो.
 
* गूळ आणि गहू देखील ठेवू शकता.
 
* आपण यामध्ये नाणी देखील ठेवू शकता.

* भांड्यात मध भरतात.