रविवार, 25 सप्टेंबर 2022
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019 (13:53 IST)

Dhanteras खरेदी करण्यापूर्वी एकदा नक्की बघा, कामाची माहिती

धनत्रयोदशीला खरेदी करणे शुभ मानले गेले आहे. या दिवशी कोणतेही काम सुरू करणे देखील शुभ मानले जाते. धनत्रयोदशीला देवी लक्ष्मी आणि कुबेराची पूजा करून जीवनात सुख- समृद्धी कामना केली जाते. धनत्रयोदशीला नवीन वस्तू खरेदी करून त्याची पूजा करण्याची परंपरा देखील आहे परंतू या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अशुभ देखील मानले गेले आहे. तर जाणून घ्या कोणत्या अशा वस्तू आहे ज्या धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करू नये.
 
धनत्रयोदशीला लोखंडी वस्तू खरेदी करू नये. या दिवशी लोखंडी वस्तू घरात आणण्याने राहू ग्रहाची अशुभ सावली पडते आणि राहूची दृष्टी पडल्यावर समस्या वाढतात.
 
काचेचं सामान देखील राहू ग्रहाशी संबंधित असतं म्हणून धनत्रयोदशीला काचेच्या वस्तू खरेदी करू नये.
 
या व्यतिरिक्त ऍल्यूमिनियम धातूने तयार समान देखील या दिवशी खरेदी करणे टाळावे.
 
धनत्रयोदशीला काळ्या रंगाचे वस्त्र किंवा दागिने खरेदी करू नये.
 
धनत्रयोदशीला तेल किंवा तूप असे पदार्थ आणू नये. या दिवशी दिवे लावायला तेल, तुपाची गरज भासत असली तरी त्याची व्यवस्था आधीपासून करावी.