रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. ग्लासातल्या ग्लासात
Written By वेबदुनिया|

अ‍ॅपल सूप

WD
साहित्य : साधारण हिरवी कडक व थोडी आंबूस सफरचंद 4-5, कॉर्नफ्लोअर 2 चमचे, लिंबाचा रस 1 चमचा किंवा लिंबू किसले तरी चालेल, दालचिनीपूड अर्धा चमचा, मीठ, थंड पाणी 1 कप, साखर अर्धा कप, जिरेपूड चिमूटभर.

कृती : सफरचंद स्वच्छ धुवावित. आतील बिया काढाव्यात. सफरचंदाची साल न काढता तुकडे साधारण बारीक करावेत. किसलेले लिंबू व सफरचंदाचे तुकडे पाण्यात टाकावेत. 15-20 मिनिट हे पाणी उकळावे व पाणी गाळणीने गाळून घ्यावे. नंतर थोड्या पाण्यात कॉर्नफ्लोअर गाठी न होऊ देता कालवून वरील पाण्यात मिसळावा. सर्व पाण्याचे मिश्रण सारखे ढवळून एकजीव करा. नंतर त्यात साखर, मीठ, दालचिनी पूड, जिरेपूड टाकून मंदाग्नीवर थोडा वेळ ठेवा. गरम झाल्यावर कढई किंवा पातेले खाली उतरवा. हे फळाचे सूप प्रकृतीस चांगले असून सर्व वयोगटाला देता येते.