रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. ग्लासातल्या ग्लासात
Written By वेबदुनिया|

क्रिमी अक्रोड सूप

ND
साहित्य : 1 मोठा चमचा अक्रोड पावडर, 1 मोठा चमचा अक्रोडाचे लहान लहान काप, 1 मोठा चमचा क्रीम, 1 मोठा चमचा कॉर्नफ्लोअर, 1 कप दूध, चवीनुसार मीठ, 1/4 लहान चमचा काळे मिरे.

कृती : सर्वप्रथम 1 कप दुधात अक्रोड पूड घालून शिजवून घ्यावे. कॉर्नफ्लोअरमध्ये 1/2 कप पाणी घालून घोळ तयार करावा. शिजत असलेल्या दुधात हा घोळ व आवश्यकतेनुसार पाणी घालावे. मिश्रणाला हालवत राहावे, ज्याने त्यात गोळे पडत नाही. त्यात काळे मिरे व काप केलेले अक्रोडाचे तुकडे घालून गॅस बंद करावा. तयार सुपामध्ये क्रीम घालून गरम गरम सर्व्ह करावे.