रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By वेबदुनिया|

मँगो आईसक्रीम

साहित्य : 1 वॅनिला आईसक्रिम पॅक, 1 मोठा आंबा, 1/4 वाटी साखर, 1-2 काड्या केशर, 2 वेलच्यांची पूड.

कृती : सर्वप्रथम आंब्याची साल काढून साधारण इंचभर मोठे चौकोनी तुकडे करून घ्यावेत. एका जाड बुडाच्या पातेल्यात आंब्याचे तुकडे, साखर, केशर, वेलची पूड एकत्र करून मध्यम गॅसवर ठेवावे. सतत ढवळत रहावे. आंबा साधरण शिजत आला की गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्यावे. वॅनिला आईसक्रिम थोडे आणि वरील थंड केलेले मिश्रण त्यात मिसळावे. साधारण मिक्स होईल असे मिसळावे. एकजीव करण्याची आवश्यकता नाही. हे मिसळलेले आईसक्रिम परत साच्यांमध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवावे. सेट झाल्यावर खायला द्यावे.